Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:43 AM2022-02-28T05:43:39+5:302022-02-28T05:44:21+5:30

Russia-Ukraine Conflict: ऑपरेशन गंगा माेहीम पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाकडून सरकारला संपूर्ण बिल पाठविण्यात येईल.

russia ukraine conflict air india charges costs over 1 crore to bring indians from ukraine per flight | Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ राबविण्यात येत आहे. एअर इंडियाच्या माध्यमातून ही माेहीम राबविण्यात येत आहे. एअर इंडियाला प्रत्येक उड्डाणासाठी सुमारे १ काेटी १० लाख रुपयांचा खर्च येत असून, माेहिमेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

भारतीयांना परत आणण्यासाठी ड्रीमलायनर या माेठ्या विमानांचा वापर करण्यात येत आहे. जेणेकरून एका उड्डाणामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना आणता येईल. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की ड्रीमलायनरच्या प्रत्येक उड्डाणासाठी प्रति तास ७ ते ८ लाख रुपये खर्च हाेत आहेत. विमान कुठे जात आहे आणि किती अंतर पार करणार आहे, यावर खर्च अवलंबून असताे. त्यामुळे साधारणत: प्रति उड्डाण १ काेटी १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येत आहे. त्यात इंधन, चालक दलाचे वेतन, नेविगेशन, लँडिंग व पार्किंग शुल्क समाविष्ट आहे. प्रतिव्यक्ती सुमारे ६० हजार रुपये तिकीट यापूर्वी आकारण्यात येत हाेते.  त्यानुसार २५० जणांसाठी दीड काेटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. मात्र, एअर इंडिया केवळ ऑपरेशनल खर्च सरकारकडून आकारणार आहे.

उड्डाणाला लागणारा वेळ विचारात घेऊन वैमानिक व सहयाेगी कर्मचाऱ्यांची दाेन पथके ठेवण्यात येतात. एक पथक विमान घेऊन जाते, तर दुसरे पथक विमान घेऊन येते. बुडापेस्ट आणि बुखारेस्ट या शहरांसाठी सध्या एअर इंडियाची नियमित उड्डाणे नाहीत. बुखारेस्टपासून मुंबई आणि दिल्लीचा प्रवास सुमारे सहा तासांचा आहे.

केंद्र सरकार उचलणार संपूर्ण खर्च

या माेहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. काही राज्य सरकारांनीही आपापल्या राज्यातील नागरिकांना आणण्याचा खर्च देण्याचे सांगितले आहे. माेहीम पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाकडून सरकारला संपूर्ण बिल पाठविण्यात येईल. ड्रीमलायनर विमानामध्ये २५० हून अधिक जण बसू शकतात. या विमानाला प्रति तास सुमारे ५ टन इंधन लागते.

Web Title: russia ukraine conflict air india charges costs over 1 crore to bring indians from ukraine per flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.