'सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी', संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:23 PM2019-11-25T22:23:19+5:302019-11-25T22:24:19+5:30

बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली

Sandeep Kshirsagar expressed confidence "not for power but for truth" | 'सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी', संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास

'सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी', संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास

Next

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी नवीन आमदारांना सदस्यत्वाची खात्री देत ती माझी वैयक्तिक जबाबदारी असल्याचं म्हटलं. तर, उद्धव ठाकरेंनीही भाजपाला इशारा देत, मुख्यमंत्र्याच्या मी पुन्हा येईन घोषणेचा समाचार घेतला. या शपथविधी सोहळ्याला तिन्ही पक्षांचे आमदार हजर होते. 

महाविकास आघाडीच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असलेले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट लिहून सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केलाय. ''मुंबईतील हॉटेल हयातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना-अपक्ष आमदारांच्या महाविकासआघाडीच्या 162 विधिमंडळ सदस्यांनी संविधानाला साक्षी मानून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करणार शपथ घेतली. रात्रीच्या अंधारात, अनैतिक मार्गाने स्थापन झालेल्या सरकारच्या विरोधात मत देण्याबाबत शपथ घेतली. यावेळी आमचे नेते शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.अबु आसिम आझमी यांच्यासह सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची यावेळी उपस्थिती होती,'' असे आपल्या फेसबुक पोस्टवर लिहंले आहे. आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर सत्यासाठी, लोकशाहीसाठी एकत्र आलो होतो. सत्यमेव जयते, असे म्हणत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास आपल्या फेसबुक पोस्टवरुन व्यक्त केला आहे. 

दरम्यान, बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, अशा शब्दात पवारांनी भाजपाच्या नेत्यांना दम भरला. तसेच, आमदारांना विश्वास देताना, तुमचे सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असं सांगत आमदारांना शब्द दिला. 

Web Title: Sandeep Kshirsagar expressed confidence "not for power but for truth"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.