Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 11:41 AM2023-05-03T11:41:13+5:302023-05-03T11:43:30+5:30

Sharad Pawar: पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

Sharad Pawar: As Chhagan Bhujbal has said that Ajit Pawar should be the axis of the state and Supriya Sulena should be the center's axis. | Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

googlenewsNext

मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मंगळवारी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज घोषणा केली. मात्र सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. 

पवारांच्या या धक्क्याने पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असून, पवारांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राज्यातील अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. राज्यातून अनेकांचे फोन येऊ लागले. काही पदाधिकारी, नेते मुंबईला येऊन शरद पवारांना भेटण्यासाठी रवाना झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह लक्षात घेता, आपल्या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी द्यावा, असा निरोप शरद पवारांनी आंदोलन करणारे कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभा सदस्य असलेले आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची ही चर्चा आहे. याशिवाय सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. 

राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू  झाली आहे  बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.  सुप्रिया सुळे यांना केंद्राची आणि अजित पवार यांना राज्याची धुरा द्यावी, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. 

शरद पवार, राजीनामा अन् चर्चांना उधाण-

अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांना नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. वयाच्या ८३व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे शरद पवार यांनी दाखवून देण्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे. 

Web Title: Sharad Pawar: As Chhagan Bhujbal has said that Ajit Pawar should be the axis of the state and Supriya Sulena should be the center's axis.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.