Sharad Pawar: ...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 07:10 PM2023-06-10T19:10:18+5:302023-06-10T19:12:47+5:30

Sharad Pawar: अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar said that since Ajit Pawar is the leader of the opposition party, he was not given the responsibility | Sharad Pawar: ...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले!

Sharad Pawar: ...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले!

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे  यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत.  दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'

अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र स्वत: शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहे आणि जयंत पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही जबाबदारी नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तशी कोणतीही जबाबदारी नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे - सुप्रिया सुळे 

पक्षाच्या अध्यक्ष पदाची जागा आत्ता रिकामी नाही. भविष्यात काय होईल याचं उत्तर काय देणार? राष्ट्रीय अध्यक्ष पद रिकामं झाल्यावर नवीन अध्यक्षांचा विचार करू, असं शरद पवारांनी सांगितले. तसेच हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, पक्षानं सामूहिक विचार विनिमयानं घेतलेला हा निर्णय घेतला असल्याचे शरद पवारांनी सांगितले. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्याचप्रमाणे अजित पवार नाराज आहे असं काहीजण म्हणतात. पण यामध्ये काही तथ्यं नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

'अजित पवार यांच्यावरचा अन्याय आता सहन होत नाही'; सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करत मनसेचा टोला

दरम्यान, कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्रनजरे समोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन, असे अजित पवारांनी म्हटले आहे. 

Web Title: Sharad Pawar said that since Ajit Pawar is the leader of the opposition party, he was not given the responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.