शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:43 AM2019-09-07T06:43:05+5:302019-09-07T06:43:09+5:30

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा येथील मतदारांच्या संख्येचा विचार करता अंधेरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार

Shiv Sena-BJP alliance challenges Congress | शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसला आव्हान

शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसला आव्हान

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील अंधेरी पूर्व हा प्रामुख्याने औद्योगिक वसाहत आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेला आणि १०३,१०० मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेला हा मतदार संघ आहे. गेल्यावर्षी १७ डिसेंबरला येथील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीमुळे हा मतदार संघ मुंबई पासून ते थेट दिल्लीपर्यंत चर्चेत आला. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वे याच मतदार संघातून मार्गक्रमण करत जात असल्याने कामानिमित्त रोज मेट्रोने या मतदार संघात येणाऱ्यांची संख्या लाखांवर आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने देशी व परदेशी प्रवासी येथून मार्गक्रमण करतात. तर येथे पंचतारांकित हॉटेल्स देखिल मोठ्या प्रमाणात आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा येथील मतदारांच्या संख्येचा विचार करता अंधेरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार २,६७,४२९ असून पुरुष मतदार १,४५,४२४ तर महिला मतदारांची संख्या १२१,४१० इतकी आहे. यामध्ये जातीनिहाय मराठी मतदार १,०३,१००, उत्तर भारतीय ५५,२००, अल्पसंख्याक ३६४००, गुजराथी/राजस्थानी ३३,६००, दक्षिण भारतीय १८,६००, ख्रिश्चन १४,५०० इतर ६ हजार अशी मतदारांची संख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना एकूण ५७००६३ तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना ३०९७३५ इतकी मते मिळाली होती. कीर्तिकर यांनी निरुपम यांचा या मतदार संघातून सुमारे २६०,३२८ इतक्या मोठ्या मताधिक्याने दारुण पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवसणुकीत अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघाला महायुतीने यश मिळवून दिले. महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना ९७७२७ तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना ४७९८८ इतकी मते मिळाली. या मतदार संघाने कीर्तिकर यांना यश मिळवून देताना ४९, ७३९ मतांची इतकी मोठी आघाडी मिळवून दिली. २०१४ पर्यंत हा लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत सुरुंग लावला. २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेनाभाजपा युती तुटली होती. यावेळी येथून भाजपाचे ४, काँग्रेसचे २ व शिवसेनेचा २ असे एकूण ८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या प्रभाग क्रमांक ७६ च्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल व प्रभाग क्रमांक ८१ चे भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांचा जातीचा दाखला अवैध ठरवत त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. त्यामुळे येथून शिवसेनेच्या संदीप नाईक व काँग्रेसच्या दुसºया क्रमांकवरील उमेदवार नितीन सलाग्रे यांना लवकरच नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे.

राजकीय घडामोडी
युती विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यात प्रमुख लढत आहे. येथील अल्पसंख्याक व ख्रिस्ती समाजाची मते काँग्रेसला हात देण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे तगडा उमेदवार दिल्यास काँग्रेस आघाडी युतीला जोरदार टक्कर देईल, अशी चर्चा आहे.

दृष्टिक्षेपात राजकारण
च्युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांना परत येथून पुन्हा तिकीट मिळेल, अशी जोरदार चर्चा मतदार संघात आहे.
च्त्यामुळे आमदार लटके यांना टक्कर देणारा काँगेसकडे तसा मजबूत उमेदवार नसल्याने काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, अशी चर्चा या मतदार संघात आहे.
च्त्यातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून काँगेसचे जेष्ठ नेते व माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी माघार घेतली असून त्यांनी येथून काँगेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अर्ज केला नाही.
च्सुरेश शेट्टी यांच्या नावाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पसंती असून त्यांचे नाव दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
च्उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष कलाईव्ह डायस, संदीप वाल्मिकी,राजकुमार यादव यांची नावे चर्चेत आहे.
 

Web Title: Shiv Sena-BJP alliance challenges Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.