शरद पवार यांनी दिले शिवसेना-काँग्रेस संबंधांचे दाखले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:52 AM2019-11-08T05:52:52+5:302019-11-08T05:53:08+5:30
शिवाय तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या निवडीच्यावेळी देखील
Next
दिल्लीत सोनिया गांधी आणि खा. शरद पवार यांच्या बैठकीत पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संबंधाचे इतिहासातील काही दाखले दिल्याची माहिती आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीचे समर्थन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. नंतर ए.आर. अंतुले मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या पाठिंब्यावर मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक हे शिवसेनेचे नेते विधानपरिषदेवर निवडून आले.
शिवाय तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या निवडीच्यावेळी देखील ठाकरे यांचा पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेसनेते मातोश्रीवर गेले होते, अशी माहिती शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना दिल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.