Dasara Melava: ठाकरे- शिंदे गटातील वादावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 01:22 PM2022-10-05T13:22:05+5:302022-10-05T13:26:58+5:30

दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

shiv sena Dasara Melava Leader of Opposition Ajit Pawar reacts to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray | Dasara Melava: ठाकरे- शिंदे गटातील वादावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले ...

Dasara Melava: ठाकरे- शिंदे गटातील वादावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले ...

Next

Maharashtra Politics: दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत.यावर आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिवसेनेतील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. 

"दोन्ही गटांनी सांमजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आपआपली त्यांनी दाकद दाखवावी, त्यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. पण महाराष्ट्राची एक परंपरा आहे, त्या परंपरेला डाग लागणार नाही, याची काळजी घ्यावी. असं त्यांनी वागले पाहिजे. शब्दाने श वाढत असतो. प्रत्येकाने प्रत्येकाला सलोख्याच्या भावनेने पाहिले पाहिजे. जसे दिवस जास्त जातील तेव्हा कटुता कमी होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. 

 

हे सगळं का घडलं? दसरा मेळाव्यात बोलणार; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

राज्याची परंपरा राखली पाहिजे. प्रत्येकाने सलोख्याने राहायला पाहिजे याअगोदरही मी सभागृहात हे सांगितले आहे, असंही अजित पवार म्हणाले. आपले राज्य अस्थिर होण्याच्या चर्चांपेक्षा सध्या देशात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. यावर आपण लक्ष दिले द्यायला हवे असंही पवार म्हणाले.   

 “बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात”

दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. यातच शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे. शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीत शिवसेनेतील ५ आमदार आणि २ खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.

कृपाल तुमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवतांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावे यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील, असा विश्वास कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला. 

Web Title: shiv sena Dasara Melava Leader of Opposition Ajit Pawar reacts to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.