''आघाडी सरकारला शिवसेनेने पाठिंबा द्यावा''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:46 AM2019-11-10T03:46:50+5:302019-11-10T03:47:14+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत सत्ता स्थापन करावे आणि या आघाडी सरकारला शिवसेनेसह अपक्षांनी बाहेरून पाठिंबा द्यावा, असा पर्याय काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सुचविला आहे.
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत सत्ता स्थापन करावे आणि या आघाडी सरकारला शिवसेनेसह अपक्षांनी बाहेरून पाठिंबा द्यावा, असा पर्याय काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सुचविला आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप-शिवसेना युतीला जनादेश मिळाला असतानाही सरकार बनवायचे सोडून हे पक्ष एकमेकांशी भांडत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे. मात्र, युतीचे नेते सत्ता स्थापन करत नसल्याने आता काँग्रेस आघाडीने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. तसेही आघाडीकडे शिवसेनेपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे समविचारी अपक्ष, छोट्या पक्षांना सोबत घ्यावे आणि शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा घ्यावा, असे देवरा यांनी म्हटले आहे.