Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:42 PM2022-11-21T13:42:53+5:302022-11-21T13:43:54+5:30

Maharashtra News: राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात, असे सांगत संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली.

shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over congress mp rahul gandhi phone call in bharat jodo yatra | Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

Next

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांवर केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांमुळे विरोधकांकडून सत्तधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच राहुल गांधी यांनी संजय राऊतांना फोन करत त्यांची विचारपूस केली. याबाबत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप मनसेला टोला लगावत, किती लोकांना माझी चिंता आहे, अशी विचारणा केली आहे.

संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केल्याची माहिती ट्विटवरून दिली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले. राहुल गांधी यांचे कौतुक करताना भाजप आणि मनसेवर निशाणा साधला. राजकीय मतभेत असतानाही राहुल गांधी यांनी मैत्रीखातर, प्रेमाखातर आपल्याला फोन केला, ही आपल्या देशाची राजकीय संस्कृती आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

त्या लोकांना माझी किती चिंता आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात पक्षात आमेचे मित्र आहेत. कधी ना कधी आम्ही एकत्र काम केलेले आहे. पण राजकारण मित्र हा मित्र राहिलेला नाही. राहुल गांधी यांचा मला फोन येणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. भाजप, मनसे यांच्यात आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. पण त्या लोकांना माझी किती चिंता आहे? त्यांना तरत आनंद झाला मी जेलमध्ये गेल्यावर. याला राजकारण म्हणत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली. 

राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात

हे तर मुघलांच्या काळातील राजकारण झाले, अशी टीका विरोधकांवर करत, राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात. भारत जोडो यात्रेला त्यामुळे देशभरातूल समर्थन मिळत आहे. राहुल लोकांना आपला वाटतोय, तो यासाठीच भारत जोडो यात्रेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राहुल गांधी यांनी आपली विचारपूस केली, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भारत जोडोत व्यस्त असुनही  राहुल  यांनी  रात्री  फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे  म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय.., असे ट्विट संजय राऊत यांनी केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over congress mp rahul gandhi phone call in bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.