माणसानं लॅव्हिश राहू नये का?; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विरोधकांना प्रतिसवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 01:20 PM2021-03-19T13:20:51+5:302021-03-19T13:27:22+5:30

नितीन राऊत पुढे म्हणाले की, मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो.

Shouldn't man be lavish ?; Energy Minister Nitin Raut's response to the opposition | माणसानं लॅव्हिश राहू नये का?; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विरोधकांना प्रतिसवाल

माणसानं लॅव्हिश राहू नये का?; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विरोधकांना प्रतिसवाल

Next

मुंबई: कोरोनाच्या महामारीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. महावितरणला सक्षम करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य ग्राहकांचे आणि आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही राज्याचे  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व नागरिकांना केलं आहे.

राज्यातील सुमारे अडीच कोटी घरगुती ग्राहकांपैकी ६ लाख ९४ हजार इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ९९ टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. मात्र, एकीकडे ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा दावा भाजपाने केला होता. आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना... हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं, असे म्हणत भाजपाने नितीन राऊत यांच्या सरकारी घराचे आणि कार्यालयाचे फोटो शेअर केले आहेत. भाजपाच्या या आरोपानंतर नितीन राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅव्हिश राहू नये का असा सवाल नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचं ते समजावं. फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. 

नितीन राऊत पुढे म्हणाले की, मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणाऱ्या बातम्या कोण चालवतं हे बघितलं पाहिजे. नुसतं बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझं खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे, असं स्पष्टीकरणही नितीन राऊत यांनी दिलं आहे. 

दरम्यान, भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ऊर्जामंत्र्यांच्या सरकारी कार्यालयाचे आणि घराचे फोटो शेअर केलं होतं. यामध्ये ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी, असं म्हणत नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच राज्यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जामंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही भाजपाने केली आहे.


 

Read in English

Web Title: Shouldn't man be lavish ?; Energy Minister Nitin Raut's response to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.