एसटी महागाई भत्ता; फाइलवर साचली धूळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 05:46 AM2023-08-30T05:46:40+5:302023-08-30T05:46:54+5:30

हे सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कायम उदासीन असल्याचा आरोप  एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. 

ST Dearness Allowance; Dust on the file | एसटी महागाई भत्ता; फाइलवर साचली धूळ 

एसटी महागाई भत्ता; फाइलवर साचली धूळ 

googlenewsNext

मुंबई : एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केली. मात्र, दोन महिने उलटले तरी यासंदर्भातील फाइल मंत्रालयात धूळखात पडली आहे. हे सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कायम उदासीन असल्याचा आरोप  एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. 
एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे गेली अनेक वर्षे महागाई भत्ता दिला जातो. त्याची उजळणी-वजा घोषणा एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र अजूनही एकूण ८ टक्के थकीत महागाई भत्ता अद्याप मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सुद्धा यासंदर्भातील फाइल दोन महिन्यांपासून सरकार दरबारी धूळखात पडून आहे.

Web Title: ST Dearness Allowance; Dust on the file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.