शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:22 PM2022-10-22T14:22:07+5:302022-10-22T14:27:05+5:30

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे.

State Leader of Opposition Ajit Pawar has reacted to the visit of Raj Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde. | शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

googlenewsNext

मुंबई- गेले काही दिवस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दिवाळीचा सण आहे. दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करतोय. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात, असं अजित पवारांनी म्हटलं. तसेच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील, तर त्याच्यात चुकीचं काय आहे? असा सवालही अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या निमंत्रणाला मान देऊन मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दीपोत्सव कार्यक्रमाला आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दिवाळी आपली संस्कृती आहे. दरवर्षी प्रमाणे मनसेने दीपोत्सव कार्यक्रम केला आणि त्या निमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 

शिवतीर्थ बंगल्यावर १० मिनिटे चर्चा

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस हे आधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले, काही मिनिटांत मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर तिघांची दहा मिनिटे चर्चा झाली आणि नंतर तिघे शिवाजी पार्कवर गेले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिदे यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: State Leader of Opposition Ajit Pawar has reacted to the visit of Raj Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.