महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आघाडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 06:16 AM2023-03-09T06:16:38+5:302023-03-09T06:17:06+5:30

छत्रपती संभाजीनगरहून २ एप्रिलपासून मेळाव्यांची सुरुवात होईल, हे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

Statewide meetings of Mahavikas Aghadi Aghadi meeting was held in the presence of Uddhav Thackeray ajit pawar maharashtra | महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आघाडीची बैठक

महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आघाडीची बैठक

googlenewsNext

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर बुधवारी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषद कामकाजाला उपस्थित राहिले. या उपस्थितीनंतर महाविकास आघाडीची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडली. बैठकीत महाविकास आघाडीचे राज्यभर संयुक्त मिळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरहून २ एप्रिलपासून मेळाव्यांची सुरुवात होईल, हे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात ही बैठक झाली. बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, काँग्रेसचे सुनील केदार, सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील अन्य आमदार उपस्थित होते.  

नियोजनासाठी...
सभांचा कार्यक्रम आणि नियोजनासंदर्भात १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे. २ एप्रिलला संभाजीनगर, १६ एप्रिल रोजी नागपूर, १ मे रोजी मुंबई, १४ मे रोजी पुणे, २८ मे रोजी कोल्हापूर, ३ जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त मेळावा घेतला जाणार आहे.

Web Title: Statewide meetings of Mahavikas Aghadi Aghadi meeting was held in the presence of Uddhav Thackeray ajit pawar maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.