उद्या काँग्रेसचा ११ ठिकाणी रास्ता रोको, मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:08 AM2017-11-26T03:08:11+5:302017-11-26T03:08:24+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी पनवेल ते सावंतवाडीदरम्यान २७ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने ११ ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.

Stop the 11 roads in the city tomorrow, stop the Mumbai-Goa highway Durvasthala | उद्या काँग्रेसचा ११ ठिकाणी रास्ता रोको, मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेला विरोध

उद्या काँग्रेसचा ११ ठिकाणी रास्ता रोको, मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेला विरोध

Next

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी पनवेल ते सावंतवाडीदरम्यान २७ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने ११ ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व आमदार भाई जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. येथे अपघातात दरवर्षी जवळपास १ हजार प्रवासी मृत्युमुखी पडतात. महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे दुसºया टप्प्याचे जमीन अधिग्रहणाचे काम व्यवस्थित सुरू नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्यांची जमीन, घरे व दुकाने उद्ध्वस्त होत आहेत; त्यांना दिला जाणारा मोबदला कमी-जास्त रक्कम देऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. याविरोधात हे आंदोलन आहे.
आंदोलनात खा. हुसेन दलवाई, आमदार हुस्नबानो खलिफे, माजी आमदार माणिक जगताप, विश्वनाथ पाटील, आर. सी. घरत, माजी आमदार मधुशेठ ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार रमेश कदम यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.

सरकारला जागे करणार
रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीचे कंत्राट मिळालेले कंत्राटदार व अधिकाºयांच्या संगनमताने खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. काँग्रेसने वारंवार पाठपुरावा केला. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग दुरुस्ती काम आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले. परिणामी, सरकार व प्रशासनास जागे करण्यासाठी पनवेल ते सावंतवाडीदरम्यान ११ ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल.

Web Title: Stop the 11 roads in the city tomorrow, stop the Mumbai-Goa highway Durvasthala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.