भाजपच्या नरेंद्र मेहतांवरील गुन्ह्यांचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे ठाणे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:11 PM2024-03-06T15:11:47+5:302024-03-06T15:12:32+5:30

तपासात प्रगती व्हावी यासाठी मीरा-भाईंदरच्या एका व्यावसायिकाने संबंधित गुन्ह्याचा तपास काशीमीरा पोलिस ठाण्याहून अन्य पोलिस ठाण्याकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे झाली.

Submit crime report against BJP's Narendra Mehta, HC directs Thane police | भाजपच्या नरेंद्र मेहतांवरील गुन्ह्यांचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे ठाणे पोलिसांना निर्देश

भाजपच्या नरेंद्र मेहतांवरील गुन्ह्यांचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे ठाणे पोलिसांना निर्देश

मुंबई : मीरा-भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात निष्पक्ष तपास करून दोन आठवड्यांत तपास प्रगती अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानेठाणेपोलिसांना दिले.

तपासात प्रगती व्हावी यासाठी मीरा-भाईंदरच्या एका व्यावसायिकाने संबंधित गुन्ह्याचा तपास काशीमीरा पोलिस ठाण्याहून अन्य पोलिस ठाण्याकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे झाली.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एक इमारत मेहता यांनी हडप केली, असा आरोप व्यावसायिकाने केला आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असे याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपास पूर्ण केलेला नाही, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे न्यायालयाने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना तपास प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

गुन्ह्याशी संबंधित नवीन तथ्य समोर येत आहेत आणि नवीन साक्षीदार पुढे येत आहे. पोलिस त्यांचे जबाब  नोंदवत आहेत, अशी माहिती घरत यांनी उच्च न्यायालयाला दिली.  ‘तपास योग्य व निष्पक्ष असावा, याबाबत आम्हाला चिंता आहे. सर्व कायद्यानुसार करा,’ असे न्यायालयाने म्हटले. 
 
Web Title: Submit crime report against BJP's Narendra Mehta, HC directs Thane police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.