'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', चंद्रकांत पाटलांचे विधान; रोहित पवारांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 08:44 AM2024-06-25T08:44:16+5:302024-06-25T08:48:27+5:30

Rohit Pawar : दोन दिवसापासून पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

Such incidents did not happen in Pune when I was Guardian Minister Chandrakant Patil's statement Rohit Pawar crtiticized | 'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', चंद्रकांत पाटलांचे विधान; रोहित पवारांनी फटकारले

'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', चंद्रकांत पाटलांचे विधान; रोहित पवारांनी फटकारले

Rohit Pawar ( Marathi News )  : गेल्या वर्षी पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे समोर आले. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही या प्रतिक्रिया दिली.  'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. 

मराठी माणसांसाठी मुंबईत ५०% घरे आरक्षित ठेवा; कायदा करण्याची उद्धवसेनेची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये गेल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पवार यांच्याकडे दिला होता. तेव्हापासून पवार आणि पाटील यांच्यात कोल्ड वार सुरू आहे.  

आमदार रोहित पवार काय म्हणाले?

‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील  दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथा इडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे. आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

'पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती, अशी टीकाही पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

'सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी सिरीअस व्हा, आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा. अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही, असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमोल मिटकरींचाही चंद्रकांत पाटलांना टोला

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या 'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही' या विधानानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. 'चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथीत आहेत',असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. 

Web Title: Such incidents did not happen in Pune when I was Guardian Minister Chandrakant Patil's statement Rohit Pawar crtiticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.