राष्ट्रवादीतील फुटीनंतर... विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:48 AM2023-07-16T10:48:15+5:302023-07-16T10:50:22+5:30

रणनीतीसाठी विरोधकांची आज बैठक; चहापानावर बहिष्कार टाकणार?

Test of the opposition in the legislative session of maharashtra assembly after Ajit Pawar | राष्ट्रवादीतील फुटीनंतर... विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी

राष्ट्रवादीतील फुटीनंतर... विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चहापानासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केले आहे. त्या आधी विरोधी महाविकास आघाडीच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत अधिवेशनासाठीची रणनीती ठरणार आहे. फाटाफुटीमुळे क्षीण झालेल्या विरोधी पक्षासमोर सरकारची कोंडी करण्याचे मोठे आव्हान असेल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असेल. सत्तापक्षाकडे २०० हून अधिक आमदारांचे बहुमत आहे. त्या मानाने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे विरोधी पक्ष दुबळे वाटतात. सरकारला घेरण्याची संधी आम्ही सोडणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आधीच जाहीर केले आहे. हे लक्षात घेता विरोधक मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतील अशी शक्यता अधिक आहे. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असणे, शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, कायदा व सुव्यवस्था स्थिती, कृषी मालाचे भाव, राज्यातील पीक परिस्थिती, महाराष्ट्रभूषण सोहळ्यातील दुर्घटना, जातीय तणावाच्या काही शहरात घडलेल्या घटना, पाऊल लांबल्याने शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका आदी विषयांवर विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात ऐनवेळी राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्याने भाजप व विशेषत: शिवसेना व अपक्षांतील इच्छुकांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्यामुळे शिवसेना व अपक्ष आमदारांच्या नाराजीचे पडसाद अधिवेशनात 

राष्ट्रवादी आमनेसामने
n शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आले होते. आता हीच स्थिती राष्ट्रवादीबाबत असेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जयंत पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. दोन गटांत संघर्ष होईल की समझोता हेही दिसेल. 

...अन् अजित पवारांचे प्रश्न परत गेले 
विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेत प्रश्नोत्तराच्या 
तासात उपस्थित करण्यासाठीचे प्रश्न आधीच लेखी स्वरूपात विधानमंडळाकडे द्यावे लागतात. त्यानुसार विरोधी पक्षांच्या 
काही सदस्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयातूनही काही प्रश्न पाठविण्यात आले होते. २ जुलैला अजित पवार हे स्वत:च उपमुख्यमंत्री झाले; त्यामुळे आता ते प्रश्न मागे घेण्यात 
आले आहेत. 

विरोधी पक्षनेता कोण? 
n अजित पवार उपमुख्यमंत्री 

झाल्याने रिक्त झालेले विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार या बाबत उत्सुकता आहे. 
n या पदावर काँग्रेसचा दावा असला तरी तसे पत्र पक्षाने अद्याप विधानसभा अध्यक्षांना दिलेले नाही. 
n काँग्रेसकडून प्रस्ताव जाईल, अध्यक्ष त्यास मान्यता देतील तेव्हाच विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार आहे.
उमटू शकतात. 

Web Title: Test of the opposition in the legislative session of maharashtra assembly after Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.