काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीला वरुण सरदेसाईंची हजेरी; नाना पटोले म्हणाले, "ज्या दोन आमदारांनी गडबड केली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:45 PM2024-08-05T13:45:11+5:302024-08-05T13:51:19+5:30

ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी रविवारी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली होती.

Thackeray group leader Varun Sardesai attended the Congress meeting on Sunday | काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीला वरुण सरदेसाईंची हजेरी; नाना पटोले म्हणाले, "ज्या दोन आमदारांनी गडबड केली..."

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीला वरुण सरदेसाईंची हजेरी; नाना पटोले म्हणाले, "ज्या दोन आमदारांनी गडबड केली..."

Varun Sardesai at Congress Metting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप ठरवण्यापूर्वीच काँग्रेसने रविवारी बैठक घेतली. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीसाठी शिवसेना युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई हे लीला हॉटेलध्ये दाखल झाले होते. कॉँग्रेसची  बैठक सुरू असतानाच वरुण सरदेसाई हे भेटीसाठी दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र या बैठकीला काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी गैरहजर होते. झिशान सिद्दीकींच्या मतदार संघातून वरुण सरदेसाई इच्छुक असल्याचं बोललं जातंय. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं.

महाविकास आघाडीमध्ये वांद्रे पूर्वच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. वांद्रे पूर्वचे आमदार हे झिशान सिद्दीकी आहेत. तर याच मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी वरुण सरदेसाई हे आग्रही आहेत. अशातच वरुण सरदेसाई यांनी थेट काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली होती. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत इतर पक्षाचा नेता आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीबाबत आता नाना पटोले यांनी भाष्य केलं.

"विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. त्यामध्ये सात आमदारांमधील ज्या दोन आमदारांनी गडबड केली त्यांची ओळख पटवण्यासाठी वरुण सरदेसाई आले होते," असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं. 

झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली नाराजी

काँग्रेसच्या बैठकीला वरुण सरदेसाई उपस्थित राहिल्याने आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली. "वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीत एकटे गेले तर कदाचित त्यांना काँग्रेसमध्ये जावे लागेल. मात्र काँग्रेस पक्षाने मला या बैठकीला बोलावले नाही आणि आजकाल मला काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला बोलावले जात नाही. पण आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करतो. वांद्रे पूर्व विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर काँग्रेस कार्यकर्त्याचा पराभव ठरेल. माझ्याविरुद्ध अनेक वर्षांपासून षडयंत्र रचले जात आहे. काही नेतेही मला बाजूला करण्यात धन्यता मानत आहेत," असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Thackeray group leader Varun Sardesai attended the Congress meeting on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.