ठाणे महापालिकेचा क्लस्टरचा इम्पॅक्ट असेसमेंट अहवालाच आता वादाच्या भोवऱ्यात, कॉंग्रेसने केला गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:51 PM2018-06-07T15:51:37+5:302018-06-07T15:51:37+5:30
क्लस्टरच्या योजनेवरुन आता ठाण्यात मोठे वादळ निर्माण झाले आहे. गावठाण आणि कोळवाडे वगळण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केल्यानंतर कॉंग्रेसने पलटवार केला आहे. पालिकेने सादर केलेला इम्पॅक्ट असेसमेंट अहवालच कसा चुकीचा आहे, याचा पदार्फाश कॉंग्रेसने केला आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेची क्लस्टर योजना आता आणखी वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आघडी सरकारच्या काळात २०१४ साली क्लस्टरबाबत काढण्यात आलेल्या आधीसूचनेनंतर न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी ठाणे महापालिकेने एका रात्रीत इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला होता. यात केवळ आठच क्लस्टर घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा नव्याने अधिसूचनेनंतर महापालिकेने शहरातील ४४ सेक्टरमध्ये क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरश्यक असलेला इम्पॅक्ट असेसमेंट अहवालच तयार करण्यात आला नसल्याचा गौप्यस्फोट ठाणे शहर कॉंग्रेसने केला आहे. दुसरीकडे क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नसून पालकमंत्र्यांनी अशा प्रकारची घोषणा करून आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला आहे.
क्लस्टरमधुन गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यासाठी संपूर्ण ठाणे शहरातून याला विरोध होत आहे. क्लस्टर नको अशी ठाम भूमिका गावठाण आणि कोळीवाड्या परिसरातील नागरिकांची असल्याने अखेर बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन कोळीवाडे आणि गावठाण परिसराला तूर्तास क्लस्टरमधून वगळण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे आणि गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन क्लस्टरबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यावेळी शासनाच्या वतीने क्क्लस्टर योजना जाहीर करण्यात आली त्यावेळी शासनाच्या वतीने ४ मार्च २०१४ साली क्लस्टरबाबत अधिसूचना काढण्यात आली. मात्र ही योजना राबविताना वाढणाºया लोकसंख्येसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार असल्याने या योजनेचा कशाप्रकारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार आहे याचा याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचे सांगून दत्तात्रय दौंड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने आधी याबाबत इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सादर करा असे आदेश देऊन या योजनेला स्थिगती आणली. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाणे महापालिकेने सप्टेंबर २०१५ साली एका रात्रीत क्रि स्टल या संस्थेकडून इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करून तो न्यायालयात सादर केला आणि न्यायालयाची स्थगिती उठवली असल्याची माहिती गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी दिली आहे. यामध्ये केवळ आठच युआरपी घेण्यात आले होते. मात्र ५ जुलै २०१७ साली पुन्हा एकदा अधिसूचना काढण्यात आल्यानंतर ठाणे महापालिकेने कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार केला नसून आता मात्र ४४ युआरपी टाकण्यात आले आहेत. ही संपूर्ण प्रक्रि याच बेकायदेशीर असून याबाबत घराघरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.
दुसरीकडे गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याची घोषणा करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नसून पालकमंत्र्यांनी आचार संहितेचा भंग केला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. मत जाऊ नये म्हणून आता कोळीवाडे आणि गावठाण परिसरातील नागरिकांबाबत ही घोषणा केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आपापल्या मतदार संघामध्ये युआरपी टाकण्यात आले असल्याचे सांगून येत्या चार वर्षात क्लस्टर होणे शक्य नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सामोरा समोर येऊन क्लस्टरचा अभ्यास किती आहे हे दाखवा -
क्लस्टर बाबत सत्ताधारी शिवसेने आणि आमचा अभ्यास किती आहे हे समोरासमोर येऊन दाखवा असे थेट आव्हाने देखील चव्हाण यांनी केले आहे. आम्हाला पूर्ण ज्ञान आहे असे आम्ही म्हणणार नाही मात्र आपल्याला किती अभ्यास आहे हे दाखवा असेही त्यांनी सत्ताधाºयांना खेल आव्हान दिले आहे.