'पुण्यातील कार्यक्रम दोन महिन्या आधीच ठरलेला...; शरद पवारांच्या उपस्थितीवर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 05:50 PM2023-08-01T17:50:01+5:302023-08-01T17:51:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी (१ ऑगस्ट) आज पुणे दौऱ्यावर होते.

The event in Pune was fixed two months in advance Ajit Pawar clearly said about the presence of Sharad Pawar | 'पुण्यातील कार्यक्रम दोन महिन्या आधीच ठरलेला...; शरद पवारांच्या उपस्थितीवर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

'पुण्यातील कार्यक्रम दोन महिन्या आधीच ठरलेला...; शरद पवारांच्या उपस्थितीवर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी (१ ऑगस्ट) आज पुणे दौऱ्यावर होते. पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जेष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक, विश्वस्त रोहित टिळक उपस्थित होते, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजचा कार्यक्रम दोन महिन्यापूर्वी ठरला होता. त्यावेळी राज्यात राजकीय परिस्थिती अशी झाली नव्हती. त्यामुळे आजची पवार साहेबांची उपस्थिती संभ्रम करणारी नव्हती.  लोकमान्य टिळक ट्रस्टने यावेळी पंतप्रधान मोदी यांना देण्याच ठरवलं होतं. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शरद पवार यांना सांगितलं. यानंतर शरद पवार साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे संभ्रम होण्याचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी केलं. 

अजित पवार म्हणाले, राजकीय भूमिका वेगळी आणि परिवारातील संवाद वेगळा. पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हटल्यावर आम्ही शासनाचे दोन, तीन कार्यक्रम घेतले. पुणेकरांनी मोदी यांच मोठ्या उत्साहात स्वागत केले, कुठेही काळे झेंडे दाखवण्यात आलेले नाहीत. 

'मणिपूरमधील घटना काळिमा फासणारी आहे, तसेच वाचळवीरांवर कारवाई होईल. या संदर्भात सगळ्यांनी तीव्र शब्दांनी निषेध केला आहे, पोलिस चौकशी करतील यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले. मी या अगोदर एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र काम केलं आहे त्यामुळे आता एकत्र काम करायला काही वाटत नाही, असंही पवार म्हणाले. 

Web Title: The event in Pune was fixed two months in advance Ajit Pawar clearly said about the presence of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.