शरद पवार गटाला मिळालेले नाव २७ फेब्रुवारी पर्यंत वापरता येणार; प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:24 PM2024-02-07T20:24:58+5:302024-02-07T20:28:09+5:30
काल निवडणूक आयोगाने खासदार शरद पवार गटाला धक्का दिला.
NCP ( Marathi News ) : मुंबई- काल निवडणूक आयोगाने खासदार शरद पवार गटाला धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. यानंतर शरद पवार गटाला चिन्ह आणि नाव कोणते मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली. याबाबत आज निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून, यापुढे शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे नाव दिले. दरम्यान, हे नवीन नाव किती दिवस वापरता येणार याची जोरदार चर्चा सुरू झाली, यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठी माहिती दिली आहे.
Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार
"निवडणूक आयोगाने दिलेले पत्रक मी वाचले असून यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये असं लिहिले आहे की, राज्यसभेची निवडणूक आहे म्हणून वन टाईम नाव सुचवावे, चिन्हाच काम राज्यसभा निवडणुकीत नसते. त्यामुळे मला आता वाटते की हे नाव २७ फेब्रुवारीपर्यंतच वापरता येणार आहे, राज्यसभा निवडणुकीसाठी हे नाव वापरता येणार आहे. यात स्पष्टच सांगितलं आहे. २७ फेब्रुवारीनंतर नाव काय मिळेल हे मी सांगू शकत नाही, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेत आम्हाला आता सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे. कोणताही निर्णय लागल्यानंतर आपल्याला कोर्टात कॅवेट दाखल करावे लागते, म्हणून आम्हीही दाखल केले. आमच्या मागे कोणतीही महाशक्ती नाही ही सगळी लिगल ऑर्डर आहे, असंही पटेल म्हणााले.
शरद पवार गटाला मिळाले नाव
यापुढे शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे ओळखले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. याची मुदत आज दुपारी ४ वाजता संपली होती. असून शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यापैकीच एक नाव निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीपुरते हे नाव असल्याचेही आयोगाच्या आदेशात म्हटले गेले आहे.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस अशी तीन नावे शरद पवार गटाने दिली होती. शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही होते. आता चिन्ह कोणते देतात हे देखील औत्युक्याचे ठरणार आहे.