हे तर पाकळ्या मिटवून घेणारं 'ऑपरेशन कमळ', माजी गृहमंत्र्यांचा भाजपला जबरी टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:10 PM2023-01-13T12:10:44+5:302023-01-13T12:12:02+5:30

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे.

This is ``Operation Kamal'', a forced attack on the BJP by the former home minister Dilip Walase Patil | हे तर पाकळ्या मिटवून घेणारं 'ऑपरेशन कमळ', माजी गृहमंत्र्यांचा भाजपला जबरी टोला

हे तर पाकळ्या मिटवून घेणारं 'ऑपरेशन कमळ', माजी गृहमंत्र्यांचा भाजपला जबरी टोला

googlenewsNext

मुंबई - नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने अर्जच भरला नाही. तर, भाजपनेही उमेदवार दिला नाही. त्यामुळे, येथील पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तसेच, मी अपक्ष उमेदवार असून भाजपकडेही मला पाठिंबा मागणार आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले. भाजप आणि तांबेंच्या या राजकारणाची आता राज्यात चर्चा रंगली असून सत्यजित तांबेविरुद्ध काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही आता निराशा दर्शवत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट विश्वासघात हा शब्द वापरत तांबेना पाठिंबा नाकारला. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसेपाटील यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.   

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळीच हे ट्वीट करत भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. वळसे पाटील यांनी भाजपवर तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सत्यजित तांबेंवर निशाणा साधला असून तांबे कुटुंबीयांकडून विश्वासघात झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे, आता येथील निवडणुकांत नेमकं काय राजकारण रंगतं हेही पाहावं लागेल. सत्यजित तांबे भाजपच्या पाठिंब्यावर आमदार होतात का, आमदार बनून ते विधानपरिषदेत पोहोचताच का हेही पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरेल. 
 

 

Web Title: This is ``Operation Kamal'', a forced attack on the BJP by the former home minister Dilip Walase Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.