हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 08:18 PM2023-06-25T20:18:28+5:302023-06-25T20:19:59+5:30

कालपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

Thousands of works are started, let the works be done, Mumbai will not collapse Ajit Dada's criticized Chief Minister Eknath Shinde | हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

googlenewsNext

मुंबई- कालपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे. 

'पाणी साचल्याची तक्रार काय करता...', मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आदित्य ठाकरे संतापले

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुंबईत आमची हजारो काम सुरू आहेत. ती काम होऊदे मग बघा मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. मला संघटनेच काम करायचं आहे, त्यामुळे मी पक्षाकडे माझी इच्छा व्यक्त करुन दाखवली. सगळ्यांचा अधिकार आहे इच्छा व्यक्त करण्याचा असंही पवार म्हणाले. 

मुंबईत तुंबलेल्या पाण्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाई स्वत: पाहिली होती. 

 राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. यावरुन माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्याचाही समाचार घेतला.

शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहीजे. नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत, मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे', असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Web Title: Thousands of works are started, let the works be done, Mumbai will not collapse Ajit Dada's criticized Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.