ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, सकाळी-सकाळीच प्रवाशांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 10:10 AM2019-04-20T10:10:50+5:302019-04-20T10:17:01+5:30
ठाणे वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली आहे.
नवी मुंबई - ठाणे वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली आहे. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 30/12 किलो मिटर लगत हा प्रकार घडला. त्यामुळे हार्बर लाईन मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली आहे. ठाणेकडून वाशीला जाणाऱ्या मार्गावर लोकल ठप्प झाल्या आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु आहे.
“ट्रान्स हार्बरवरील तुर्भेजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचं काम वेगात सुरु आहे. पुढल्या 10 ते 15 मिनिटात काम पूर्ण होऊन रेल्वेसेवा पूर्ववत होईल.” असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Due to OHE issue on trans harbour near Turbhe, the train schedule on trans harbour is affected. Work of restoration is in full swing and is likely to be completed in next 10-15 minutes...
— Central Railway (@Central_Railway) April 20, 2019
Inconvenience caused is deeply regretted
ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प pic.twitter.com/DJeTpm26qw
— Lokmat (@MiLOKMAT) April 20, 2019