उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 03:48 PM2019-11-28T15:48:15+5:302019-11-28T15:50:31+5:30
या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरोधी महाराष्ट्र विकास आघाडीने बाजी मारल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात आज दाखल करण्यात आली. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? असा सवाल हायकोर्टाने करत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. लग्नानंतर घटस्फोट होणं हे नवीन आहे का असा टोला देखील हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना लगावला.
मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने दिला नकार https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) November 28, 2019
गुरुवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला स्थगिती मिळावी यासाठी काही वकिलांनी एकत्र येऊन मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेत मतदानापूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र युती म्हणून निवडणुकीला उभे राहिले असल्याने त्यांचेच सरकार स्थापन करायला हवे होते. मात्र. हायकोर्टाच्या दोन वेगवेगळ्या खंडपीठांनी ही याचिका सुनावणीसाठी घेण्यास नकार दिला.
Bombay High Court refuses
— Press Trust of India (@PTI_News) November 28, 2019
to take up urgent hearing on petition seeking stay on the swearing-in of Uddhav Thackeray
as chief minister of Maharashtra