Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:49 PM2019-04-09T18:49:06+5:302019-04-09T18:50:01+5:30

भाजपाकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात असल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला

Video: BJP's 'Namo Namo' 'Bolki' promotional work seized, Congress busted | Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश

Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारणाला रंग चढू लागला आहे. अशातच काँग्रेसकडून आज भाजपाच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील खार येथे भारतीय जनता पार्टीकडून सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत  ऑडिओ तंत्राचा वापर करण्यात येत आहे. भाजपाकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात असल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि डॉ. राजू वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांसह धाड टाकली त्यावेळी हा प्रकार समोर आला. 

इलेक्टॉनिक संदेशाद्वारे सर्जिकल स्ट्राईकचा वापर करत भाजपा प्रचार करत आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. मतदारांना भुलविण्यासाठी भाजपाकडून अशाप्रकारे प्रचार कार्डचं वाटप करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की, कोणत्याही प्रकारे निवडणुकीच्या प्रचारात भारतीय लष्कराचा वापर करण्यात येणार नाही असं असताना भाजपाकडून छापण्यात आलेल्या या प्रचार कार्डात सर्जिकल स्ट्राईकचा वापर करण्यात आला आहे. तसेच दिवसाला 5 हजार कार्ड बनविण्यात येतात आणि या कार्डवर जय हिंद स्टीकर चिटकवण्यासाठी असलेल्या मुलांना 400 रुपये दिवसाला दिले जातात. या प्रचार कार्डावर कोणत्याही प्रकाशकाचे नाव नसल्याचं नेमकं निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धुळफेक करत भाजपाकडून अशाप्रकारे प्रचार केल्याचं उघड झालं आहे. 

निवडणूक आयोगाकडून संबंधित ठिकाणी असणारे प्रचार कार्ड साहित्य, खोके जप्त करण्यात आले असून येथे काम करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

या देशात कायदा-सुव्यवस्था अस्तित्त्वात नाही, सर्जिकल स्ट्राईकचा वापर भाजपाच्या प्रचारात केला जातोय, कोणत्याही प्रकाशकाचं नाव नसताना भाजपाकडून या कार्डचं वाटप करण्यात येत आहे. ज्या पद्धतीने आचारसंहितेचं उल्लंघन केलं जातंय. छुप्या पद्धतीने गनिमी काव्याने भाजपाचा प्रचार केला जात आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली 

तसेच निवडणूक आयोग गप्प का ? खालच्या स्तरावर उतरुन भाजपा प्रचार करत आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धुळफेक करत अशाप्रकारे प्रचार करण्यात येत आहे. इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करत कशारितीने मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलं हे सांगितले जात आहे. नरेंद्र मोदींचे भाषण ऐकवले जात आहे. पाकिस्तानविरोधात नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेतली हे भाषणातून दाखविण्यात आलं आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याची टीका डॉ. राजू वाघमारे यांनी केली.  

पाहा व्हिडीओ 

Web Title: Video: BJP's 'Namo Namo' 'Bolki' promotional work seized, Congress busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.