Vidhansabha : अजित पवारांनी कान टोचताच भास्कर जाधवांची 'बिनशर्त माफी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:41 PM2021-12-22T16:41:15+5:302021-12-22T16:45:36+5:30

विरोधी पक्षनेते आणि विरोधकांकडून मी माफी मागावी, अशी मागणी होत आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण देत बिनशर्त माफी मागितली. 

Vidhansabha : Bhaskar Jadhav's 'unconditional apology' as soon as Ajit Pawar pierced his ear in vidhansabha after damand of devendra fadanvis | Vidhansabha : अजित पवारांनी कान टोचताच भास्कर जाधवांची 'बिनशर्त माफी'

Vidhansabha : अजित पवारांनी कान टोचताच भास्कर जाधवांची 'बिनशर्त माफी'

Next
ठळक मुद्देसभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी मी केवळ दिलगिरी व्यक्त करत नसून सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटले. तसेच, विरोधी पक्षनेते यांनी जरूर हक्कभंग आणावा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मुंबई - शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केल्यानं विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर तो महाराष्ट्राचा अपमान होतो मग देशाच्या पंतप्रधानांबाबत अशाप्रकारे नक्कल करत टीका करणं देशाचा अपमान होत नाही का? असा सवाल करत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आमदारांवर तोंडसुख घेतले. मात्र, मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. अखेर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कान टोचताच, भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नक्कल या सभागृहात केली जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. पंतप्रधान हे देशाचे आहेत. विधानसभेच्या सभागृहात अशाप्रकारे अंगविक्षिप्त करत असतील तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. कुठल्याही नेत्याची बदनामी या सभागृहात होता कामा नये. अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना समज द्यावी, माफी मागायला सांगावी असं त्यांनी म्हटलं. यावेळी सभागृहात भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ केला.

जाधव-फडणवीस आमने सामने आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात छोटेखानी भाषण केलं. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, कुठल्याही सन्माननीय व्यक्तीचा अवमान होईल, असे कृत्य कोणीही करू, नये, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात कान टोचले. त्यानंतर, विरोधी पक्षनेते आणि विरोधकांकडून मी माफी मागावी, अशी मागणी होत आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण देत बिनशर्त माफी मागितली. 

ऊर्जा विभागाच्या लक्षवेधीवेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50-50 लाख रुपये देण्याची घोषणा केल्याचं विधान केल्याचा संदर्भ देत भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावेळी, मध्येच मी हक्कभंग आणणारच आहे, मी हक्कभंग आणणारच आहे. भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर, भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. 

मी अंगविक्षेप केला असं विरोधी पक्षनेते म्हणतात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे, असंसदीय शब्द वापरला नाही. तरीही सभागृहाच्या भावना दुखवल्या असतील, तर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी मी केवळ दिलगिरी व्यक्त करत नसून सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटले. तसेच, विरोधी पक्षनेते यांनी जरूर हक्कभंग आणावा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

Web Title: Vidhansabha : Bhaskar Jadhav's 'unconditional apology' as soon as Ajit Pawar pierced his ear in vidhansabha after damand of devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.