मराठवाड्यातील ‘वॉटरग्रिड’ योजना रद्द करणार नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:07 AM2020-03-05T04:07:15+5:302020-03-05T04:07:26+5:30

मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी वॉटरग्रिड योजना रद्द केली जाणार नाही. उलट गतीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

'Watergrid' scheme in Marathwada will not be canceled: Ajit Pawar | मराठवाड्यातील ‘वॉटरग्रिड’ योजना रद्द करणार नाही- अजित पवार

मराठवाड्यातील ‘वॉटरग्रिड’ योजना रद्द करणार नाही- अजित पवार

googlenewsNext

मुंबई : मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी वॉटरग्रिड योजना रद्द केली जाणार नाही. उलट गतीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद आणि
लातूर जिल्ह्यातील वॉटरग्रिड प्रकल्पांबाबतचा प्रश्न विचारला होता. या योजनेसंदर्भात मराठवाड्यातील आमदारांची बैठक आपण अलिकडे घेतली आणि त्यातही तसेच आश्वस्त केले होते. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार असून त्यासाठीची तजविजदेखील केली जाईल, असे पवार म्हणाले. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटरग्रिड प्रकल्पांसाठीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नवे सरकार ही योजना रद्द करायला निघाले आहे, अशी टीका केली.

Web Title: 'Watergrid' scheme in Marathwada will not be canceled: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.