Video : चीनमध्ये अडकलेल्या अश्विनीला पृथ्वीराज 'बाबांचा' व्हॉट्सअप कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:43 PM2020-02-11T14:43:03+5:302020-02-11T16:18:52+5:30
भारत सरकारच्या इंडिया इन चायना या ट्विटर हँडलवरुनही हुबेई आणि चीनमधील
मुंबई - भारत सरकारने चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवले आहे. मात्र, अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घरवापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. त्यातच, मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. अद्यापही 60 ते 70 जण वुहान या शहरात अडकल्याची माहिती पाटील यांनी दिली. लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं. त्यानंतर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला.
भारत सरकारच्या इंडिया इन चायना या ट्विटर हँडलवरुनही हुबेई आणि चीनमधील भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधत आहोत. पण, तत्पूर्वी आपणही प्रकृतीची काळजी घ्यावी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं अनुकरण करावे, असे आवाहन भारत सरकारने चीनमधील भारतीय नागरिकांना केलंय. भारत सरकारच्या या ट्विटर हँडलवर मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी कमेंट करुन आपली व्यथा मांडली होती.
मोदीजी, आम्हालाही 'एअरलिफ्ट' करा; वुहानमध्ये अडकलेल्या मराठमोळ्या तरुणीची साद
चीनमध्ये अडकलेल्या आणि मूळच्या सातारच्या अश्विनी पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण व्हॉट्सअप कॉलद्वारे यांनी संपर्क साधून संवाद साधला. अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांना आश्वासक धीर देत चीनमधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना मुंबईत आणण्यात येईल, असेही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका फोन कॉलने अश्विनीला मोठा धीर मिळाला आहे. विशेष म्हणजे, पर्यायी पासपोर्टचीही व्यवस्था होईल, यादरम्यान कोणतीही अडचण आली तर डायरेक्ट संपर्क साधण्याचही चव्हाण यांनी अश्विनीला म्हटले.
Just spoke with Ashwini Patil a resident of Satara who is stranded in Wuhan as her passport is stuck with VFS Global for stamping. @DrSJaishankar@MEAIndia@EOIBeijing Please ensure her quick and safe return back home. https://t.co/tj7ESZnlw7
— Prithviraj Chavan (@prithvrj) February 10, 2020
दरम्यान, माझ्यासह अनेक भारतीय नागरिक वुहान आणि जवळील शहरांमध्ये आहोत. त्यामुळे, कृपया आमच्याशी संपर्क साधून आम्हाला येथून मायदेशी वा सुरक्षितस्थळी घेऊन जावे, अशी विनवणी अश्विनीने केली आहे. पाटील यांच्यासह 60 ते 70 भारतीय नागरिक वुहानमध्ये अडकले असून त्यांचा जीव धोक्यात आहे. भारत सरकारने आत्तापर्यत 2 विमाने पाठवून जवळपास 700 भारतीयांना चीनमधून भारतात आणले आहे. तसेच, आम्हालाही एअरलिफ्ट करून आमची कोरोनाग्रस्त भागातून सुटका करावी, अशी भावनिक साद पाटील यांनी घातलीय.