आमदार अपात्रतेचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:18 IST2023-08-18T16:18:07+5:302023-08-18T16:18:39+5:30
शिवसेनेतील सोळा आमदार अपात्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.

आमदार अपात्रतेचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली मोठी माहिती
मुंबई- शिवसेनेतील सोळा आमदार अपात्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. सुप्रीम कोर्टातही या प्रकरणी सुनावणी झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. आमदारांच्या अपात्रते प्रकरणी आता विधानसभा अध्यक्षांनी मोठी अपडेट दिली आहे.
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचे ९ निर्णय
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेची कारवाई ही न्यायिक प्रोसेस आहे, त्यामुळे सर्व नियमांचे पालन करुन कारवाई केली जाईल. सगळ्या तरतुदीचे पालन होत आहे. सुनावणीची तयारी सुरू आहे. लवकरच सुनावणी सुरू होईल, असंही नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. ५४ आमदारांना नोटिसा पाठविल्या असून, न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशांचे पालन केले जाईल, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते.
'या' १६ आमदारांवर होऊ शकते कारवाई
१. एकनाथ शिंदे
२ .अब्दुल सत्तार
३. संदीपान भुमरे
४. संजय शिरसाट
५. तानाजी सावंत
६. यामिनी जाधव
७. चिमणराव पाटील
८.भरत गोगावले
९.लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. अनिल बाबर
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. रमेश बोरणारे
१६. बालाजी कल्याणकर