VIDEO: मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला; संजय निरुपम संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 01:26 PM2017-12-01T13:26:56+5:302017-12-01T14:05:21+5:30
'मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत.
संजय निरुपम यांनी यानंतर अजून एक ट्विट केलं. 'कार्यकर्त्यांना रोज फेरीवाल्यांकडून मार खावा लागत असल्याने मी मनसेची निराशा समजू शकतो. त्यांनी आमच्या कार्यालयावर केलेला हल्ला भ्याड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा चोख प्रत्युत्तर देण्यात येईल', असं संजय निरुपमांनी सांगितलं आहे.
#MNS के कायर,नपुंसक और लुक्खे कार्यकर्ताओं ने हमारे पार्टी मुख्यालय तब तोड़फोड़ किया,जब वहाँ कोई नहीं था।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 1, 2017
पुलिस स्टेशन 25 मीटर दूरी पर है।अगर CM @Dev_Fadnavis कार्रवाई नहीं करेंगे तो
करारा जवाब मिलेगा।
I can understand the frustration of #MNS, whose workers r being beaten up by Hawkers regularly. Their attack on our office is a coward act.
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 1, 2017
CM @Dev_Fadnavis must act fast or
a befitting reply will be given for sure.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस कार्यालयावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली. मनसे नेता संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक. इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट त्यांनी केले.
#Mumbai: Unidentified persons vandalized Mumbai Congress office at CST, more details awaited pic.twitter.com/hqfUDYyBXZ
— ANI (@ANI) December 1, 2017
सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. पण हल्ला झाल्यानंतर काहीवेळाने मनसेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. दरम्यान काँग्रेनसही मनसेचे झेंडे जाळत हल्ल्याचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे.
मनसैनिकांना झालेल्या मारहाणीचे संजय निरुपमनी केले होते समर्थन
विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले होते. विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी असे संजय निरुपम यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.