गहुंजे बलात्कारप्रकरणी महिला आयोग फेरविचार याचिका दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:32 AM2019-08-01T06:32:32+5:302019-08-01T06:32:36+5:30
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली. राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला होता
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशी रद्द केली. याप्रकरणी मुंबईउच्च न्यायालयात फेरविचार याचिका अथवा गरजेनुसार सर्वोच्च न्यायालयात या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली. राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला होता. तरीही दोषी पुरुषोत्तम बोराटे, प्रदीप कोकडे यांना फाशी देण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे त्यांची फाशी रद्द करून जन्मठेप देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाशी सहमत नसल्याचे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. दिरंगाई या एकाच कारणाने दोषींच्या क्रौर्याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, हे अनाकलनीय आहे. सामूहिक बलात्कार व हत्या झालेल्या ज्योतीकुमारी चौधरी हिला न्याय नाकारण्यासारखेच आहे. म्हणून आयोगाने न्यायालयीन लढाईत भाग घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. दिरंगाई का झाली? कोणी केली? याच्या सखोल चौकशीची सूचनाही त्यांनी राज्य सरकारला केली. राज्य सरकारने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या.