तरुण आरोपीला उच्च न्यायालयाने दिली सुधारण्याची संधी, अंतरिम जामीन केला मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 02:07 AM2020-12-26T02:07:11+5:302020-12-26T02:07:38+5:30

High Court : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हा आरोपी येरवडा कारागृहात आहे.

The young accused was granted interim bail by the High Court | तरुण आरोपीला उच्च न्यायालयाने दिली सुधारण्याची संधी, अंतरिम जामीन केला मंजूर

तरुण आरोपीला उच्च न्यायालयाने दिली सुधारण्याची संधी, अंतरिम जामीन केला मंजूर

googlenewsNext

मुंबई : अर्जदार २० वर्षीय असून त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. ‘सुधारण्यासाठी प्रयोग’ असे म्हणत उच्च न्यायालयाने पुण्याच्या तरुणाविरोधात दोन गुन्हे नोंदविलेले असतानाही त्याची अंतरिम जामिनावर सुटका केली.
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हा आरोपी येरवडा कारागृहात आहे. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे, असे म्हणत न्यायालयाने त्याच्यावर ससून रुग्णालयातील क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडून समुपदेशन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या आरोपीचे समुपदेशन सुरू आहे. त्यामुळे मदतच होणार आहे. कारण आरोपीला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे की हेच प्रकार त्याला सुरू ठेवायचे आहे, हे समजेल, असे न्या. भारती डांगरे यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने सांगितले.
आराेपीचे वय पाहता त्याला सुधारण्याची संधी मिळायला हवी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला केली. 
वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने असे नमूद केले की,  १० फेब्रुवारीपासून आरोपी येरवडा कारागृहात आहे. त्याचे वय संवेदनशील आहे. त्यामुळे त्याचे लहान असलेले वय पाहता त्याला बराच काळ कारागृहात ठेवले तर तो अट्टल गुन्हेगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  आराेपीला सुधारण्याची संधी द्यायला हवी, असे निरीक्षण नाेंदवून २२ डिसेंबर रोजी आरोपीचा अंतरिम जामीन अर्ज  न्यायालयाने मंजूर केला.

Web Title: The young accused was granted interim bail by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.