11 more patients have been found to be infected by Omicron in maharashtra
CoronaVirus News: राज्यात आज ११ ओमायक्रोनबाधित रुग्णांची नोंद; तर ८२५ कोरोना रुग्णांची भर By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 08:42 PM2021-12-21T20:42:22+5:302021-12-21T21:04:18+5:30Join usJoin usNext गेल्या २४ तासांत राज्यात 825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज दिवसभरात 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 111 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 73 हजार 053 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 78 , 83, 061 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात आज 11 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 34 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतर सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता देशातील विविध भागात परसलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसओमायक्रॉनcorona virusCoronavirus in MaharashtraOmicron Variant