26 July Mumbai Floods : Heavy rains flood Mumbai like never before; Flashback Pics
26 July Mumbai Floods: 'त्या' जलप्रलयाच्या आठवणींनी आजही घाबरते मुंबई By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:37 AM2018-07-26T11:37:23+5:302018-07-26T12:05:57+5:30Join usJoin usNext 26 जुलै 2005च्या महापुराला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत पडलेल्या 944 मिलीमीटर पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाली होती. साचल्या पाण्यामुळे मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. लोकांवर रस्ते, लोकल, वाहनांमध्ये राहण्याची वेळ आली होती. या दिवशी 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर 500 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचं नुकसान झाले होते. दरम्यान, या घटनेला इतकी वर्षे उलटूनही महापालिकेनं अद्यापही पाण्याचा निचरा होण्यासाठी अपेक्षित बदल केलेले नाहीत. परिणामी, 300 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरही मुंबईचे जनजीवन विस्कळीत होत असून; महापूर नाही, पण येथील पुराचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. टॅग्स :पूरमुंबईपाऊसfloodMumbaiRain