सेन्सेक्सने ओलांडला 35 हजारांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 23:02 IST2018-01-17T22:58:52+5:302018-01-17T23:02:43+5:30

शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. ( सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

शेअर बाजाराने ऐतिहासिक आकडा गाठल्यानंतर शेअर बाजारामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.

सेंन्सेक्सच्या गगन भरारीचा आनंद आकाशात फुगे सोडून साजरा करण्यात आला.

सेंक्सेसमधील वाढीचा आनंद केक कापून साजरा करताना ब्रोकर आणि शेअर बाजारामधील अधिकारी वर्ग.