शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायणा'वर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 19:04 IST2018-01-10T14:29:51+5:302018-01-10T19:04:11+5:30

कमला मिल कम्पाऊंड येथे घडलेल्या अग्नितांडवानंतर मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत अधिकच जागरूक झाली आहे.

महापालिकेनं सोमवारी (8 जानेवारी) अभिनेते व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुहू येथील आठ मजल्यांच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

महत्त्वाचे म्हणजे ही कारवाई सुरू असतानाच सिन्हा घरीच होते.

जुहू येथील रामायणा बंगल्यात सिन्हा कुटुंबीयांसहीत राहतात.

रामायणा बंगल्याच्या छतावर स्वच्छतागृह, कार्यालय व देवघराचे काम केले होते. यातील देवघर वगळता उर्वरित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.