The administration has begun start monsoon work in mumbai city
मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून प्रशासनाची लगबग सुरु By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 01:48 AM2019-06-04T01:48:51+5:302019-06-04T06:28:43+5:30Join usJoin usNext मान्सूनचा मुक्काम अद्यापही अंदमानातच असला तरी दुसरीकडे ऐन पावसाळ्यात अडचणी येऊ नयेत म्हणून मुंबई महापालिकेसह रेल्वे आणि उर्वरित प्राधिकरणांनी मान्सूनपूर्व कामांवर भर दिला आहे. (सर्व छायाचित्रे : दत्ता खेडेकर) मुंबईमधील रस्त्यांची दुरुस्तीही सुरू झाली असून, पम्पिंग स्टेशनच्या कामांनीही गती घेतली आहे. रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी सुरू झाली आहे़ विशेषत: महापालिकेने मान्सूनपूर्व कामे वेगाने हाती घेतली आहेत. नालेसफाईच्या कामास प्राधान्य देण्यात आले असून, शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी या कामांनी वेग पकडला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेदेखील मेट्रो-३ च्या कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. रेल्वेलगतची छोटी गटारे साफ करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. मुंबई महापालिका मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयाच्या छताच्या दुरुस्तीने वेग पकडला आहे. समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या बोटीही आता किनारी लागल्या आहेत.