26/11 हल्ला : तब्बल 9 वर्षांनंतर मोशे भारतात परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:08 IST2018-01-16T15:40:32+5:302018-01-16T16:08:33+5:30

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांचे छत्र गमावलेला मोशे होल्त्झबर्ग तब्बल 9 वर्षानंतर भारतात परतला आहे. मंगळवारी (16 जानेवारी) सकाळी इस्रायलहून मुंबईत दाखल झाला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मुंबईत एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी मोशे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
मोशे आजोबांसोबत मुंबईत दाखल झाला.
मोशेला मुंबईत राहून त्याचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती.
मुंबई विमानतळावर आलेल्या मोशेचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केलं.
2008 मध्ये मुंबईत छाबाड हाऊसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातून मोशे वाचला होता. त्यावेळी तो केवळ दोन वर्षाचा होता. मात्र त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता.