Agnianthandov on Bucharest Island near Mumbai shamla after 40 hours
मुंबईजवळच्या बूचर बेटावरील अग्नितांडव 40 तासांनंतर शमलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 02:38 PM2017-10-09T14:38:30+5:302017-10-09T14:42:42+5:30Join usJoin usNext मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बूचर आयलंड) तेलाच्या टाकीला शुक्रवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी वीज कोसळून आग लागली होती तब्बल 40 तासांनंतर बूचर बेटावरील अग्नितांडव 40 तासांनंतर शमवण्यात अग्निशमन दलाला यश आलं मुंबई पोर्ट ट्रस्टचे अग्निशमन दल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी शर्थीचे प्रयत्न करून रविवारी (8ऑक्टोबर) संध्याकाळी आगीवर नियंत्रण मिळवलं आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल 40 तास लागल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून सांगण्यात आलं शुक्रवारी ( 6ऑक्टोबर ) जवाहर द्वीपावरील 13 क्रमांकाच्या डिझेलच्या टाकीला वीज कोसळल्यामुळे आग लागली. शुक्रवारी रात्री आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले, परंतु उष्णतेमुळे टाकीमधील वाफेचा स्फोट होऊन टाकीने पुन्हा पेट घेतला होता शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली या अग्नितांडवानंतर धुराचे मोठ-मोठ लोट परिसरात पसरले होते बूचर बेटावर इंधनाचे 15 ते 20 टँक आहेतटॅग्स :बूचर बेटआगButcher Islandfire