फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:08 AM 2024-07-10T11:08:04+5:30 2024-07-10T11:27:09+5:30
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीसाठी राधिकाने खास लूक केल्याचं दिसत आहे. Anant Ambani-Radhika Merchant Wedding : सध्या जिकडेतिकडे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
अनंत आणि राधिका १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतंच राधिका आणि अनंतचा हळदी समारंभ पार पडला.
अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीसाठी राधिकाने खास लूक केल्याचं दिसत आहे.
अनंत-राधिकाच्या हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाची थीम करण्यात आली होती. राधिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
फ्लोरल ज्वेलरीमध्ये राधिकाचं सौंदर्य खुलून आलं होतं. पण, लक्ष वेधून घेतलं ते राधिकाच्या फ्लोरल ओढणीने...
हळदीसाठी खास लूक केलेल्या राधिकाने खऱ्या फुलांची झालर असलेली ओढणी घेतली होती. मोगऱ्याच्या फुलांनी विणलेल्या या फ्लॉवर ओढणीने तिच्या सौंदर्यात भर पडली होती.
हळदी समारंभातील राधिकाच्या या लूकच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. राधिकाचा हा लूक अनिल कपूर यांची लेक रिहा कपूरने डिझाईन केली आहे.
राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरचे संस्थापक वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची कन्या आहे.
राधिका एक प्रोफेशनल क्लासिकल डान्सर आहे. सध्या ती एनकोर हेल्थमध्ये संचालक पदही भूषवत आहे. प्राणी कल्याण, नागरी हक्क, शिक्षण, आरोग्य, मानवी हक्क, आर्थिक सक्षमीकरण आणि समाजसेवा या विषयांमध्येही त्या सेवा बजावत आहेत.