कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 09:40 PM 2020-07-15T21:40:18+5:30 2020-07-15T21:46:49+5:30
आई वडिलांच्या घरट्यातून बाहेर पडले की पहिले स्वप्न हेच असते. आपलेही एक घर असावे. शहरांत सामान्यांना लाखांमध्ये मिळणारी घरे श्रीमंतांसाठी कोट्यवधीपर्यंत जातात. आई वडिलांच्या घरट्यातून बाहेर पडले की पहिले स्वप्न हेच असते. आपलेही एक घर असावे. शहरांत लाखांमध्ये मिळणारी ही घरे श्रीमंतांसाठी कोट्यवधीपर्यंत जातात. पण प्रत्येकजण कष्टातून एकतरी घर घेतोच. अनेकांना आयुष्यभर खस्ता खाल्ल्या तरीही घर घेणे शक्य होत नाही. कोरोनामुळे आता तर घरांचे हप्ते भरणेही मुश्किल झाले आहे.
परंतू मुंबईतील एका श्रीमंत उद्योगपतीने मुंबईमध्ये 100 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. महत्वाचे म्हणजे हे भारतातील सर्वात महाग फ्लॅट ठरले आहेत. हे फ्लॅट मुंबईतील पॉश कर्मीचेअल रोडवरील एका इमारतीमध्ये घेतले आहेत.
या उद्योगपतीचे नाव आहे अनुराग जैन. अनुराग जैन हे बजाज कंपनीचे मालक राहुल बजाज यांचे भाचे आहेत. त्यांची ऑटो स्पेअर पार्टची कंपनी आहे.
अनुराग यांनी मुंबईतील कर्मीचेअल रोडवरील कर्मीचेअल रेसिडेंसिमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. या दोन्हींचे क्षेत्रफळ मिळून 6371 वर्ग फूट आहे. जैन यानी एका स्क्वेअर फुटासाठी तब्बल 1,56,961 रुपये मोजले आहेत.
जैन यांच्या या फ्लॅटची मूळ किंमत 46.43 कोटी रुपयेच होती. मात्र त्यांना दुप्पट दराने खरेदी करावी लागली. कारण रजिस्ट्रेशन आणि स्टँप ड्युटी मिळून याची किंमत 100 कोटींवर गेली.
रजिस्ट्रेशनची किंमत एका स्क्वेअरफुटाला 1.56 लाख रुपये एवढी होती. तसेच पाच कोटी रुपये नुसत्या स्टँप ड्युटीसाठीच लागले. या दोन फ्ल्रटसोबत त्यांना अपार्टमेंटमध्ये 8 पार्किंगही देण्यात आली आहेत.
अनुराग जैन हे एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. त्यांची कंपनी भारत आणि युरोपमध्ये दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या ऑटो-पार्ट्स बनविते आणि पुरवठा करते.
ही इमारत 21 मजल्यांची आहे. केवळ 28 फ्लॅट आहेत. एक फ्लोअरला दोनच फ्लॅट आहेत. कारण राहणाऱ्यांना मोठी जागा मिळू शकेल. या दोन फ्लॅटच्यामध्ये 2000 स्क्वेअर फुटांची मोकळी जागा आहे. इमारत सध्या निर्माणाधीन आहे.
जर मालकांना वाटले तर दोन्ही फ्लॅट जोडताही य़ेणार आहेत. प्रत्येक फ्लॅटच्या एका बाजुला अथांग पसरलेला समुद्र आणि दुसरीकडे मुंबईनगरी दिसते.
इमारतीमध्ये सौर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट सारख्या सुविधा आहेत. तसेच टेरेसवर मोठे गार्डन आणि इन्फिनिटी पूल देखील आहे.