Aryan Khan Drugs : 'देश सोडून जाता येणार नाही, मुंबईबाहेर जाण्यासही परवानगी घ्या' By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 08:20 PM 2021-10-29T20:20:27+5:30 2021-10-29T20:41:22+5:30
Aryan Khan Drugs : १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. मुंबईतील क्रुझ ड्रग्जपार्टी प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे.
आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत हायकोर्टाने जारी केली. त्यावर, प्रत्येकी १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत.
निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NDPS कोर्टात सादर होताच कोर्ट सुटकेचे आदेश देणार आहे. त्यानंतर आर्यन खानची जेलमधून सुटका होऊन २६ दिवसांनी आपल्या घरी त्याची रवानगी होणार आहे.
१४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता.
1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन. एनडीपीएस अॅक्टच्याविरोधातील कुठल्याही उपक्रमात आरोपीचा सहभाग नसेल.
याप्रकरणातील कुठल्याही आरोपीशी, किंवा संबंधित सहआरोपी यांच्यासोबत कुठलाही संपर्क न करण्याचेही आदेश दिले आहेत. न्यायालयीन प्रकिया आणि तपासात हस्तक्षेप करेल, असे कुठलेही काम करता कामा नये.
आरोपींना तात्काळ आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करावा लागणार आहे, तसेच कोर्टाच्या आदेशानुसार देश सोडून कुठेही जाता येणार नाही.
आरोपींना मुंबईच्या बाहेर जायचे असल्यास, तपास अधिकाऱ्यांस पूर्वसूचना द्यावी लागेल. तसेच, जेथे जायचे आहे, त्याचा संपूर्ण तपशीलही द्यावा लागेल.
आरोपींना दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावावी लागेल. या प्रकरणाशी संबंधित खटल्यात न्यायालयाच्या प्रत्येक तारखेला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे.
जेव्हाही एनसीबीचं समन्स पाठविण्यात येईल, तेव्हा हजर राहावे लागेल, तपासाला सहकार्य करावे लागेल
याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असेल, तेव्हा संबंधित खटल्यात उशीर करण्याचा प्रयत्न होता कामा नये.
जामीन अर्जदाराकडून कुठल्याही अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास एनसीबी स्पेशल जज कोर्टाकडे जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करू