Balasaheb Thackeray Birth Anniversary Shivsena Balasaheb Thackeray Exclusive Cartoons
Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:15 AM2020-01-23T10:15:33+5:302020-01-23T10:31:12+5:30Join usJoin usNext हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. कणखर आवाज आणि त्याच आवाजातील भाषणं आणि ज्वलंत पण मार्मिक व्यंगचित्रे ही त्यांची ओळख. व्यंगचित्रांच्या आवडीखातर बाळासाहेबांनी द फ्री प्रेस जर्नलमधून काम केलं. मात्र नंतर स्वत:चं ‘मार्मिक’ हे प्रकाशन सुरू केलं. बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं.1956 स्वतंत्र भारतातील उद्योगधंद्यांचं हे सत्यचित्र. मोठे उद्योगपती, त्यांचे उद्योगसमूह, बडे भांडवलदार त्यांची ‘शेठगिरी’ गरगरा फुगत असताना सार्वजनिक उपक्रमांचे मात्र कुपोषण सुरू होते. केंद्रीय मंत्री व योजना आयोगाचे उपाध्यक्ष असलेल्या गुलझारीबद्दल नंदा सार्वजनिक उपक्रमांच्या वाढीसाठी बड्या उद्योगपतींकडे आशेने पाहत होते.1960 काश्मीर प्रशानावर फक्त चर्चा आणि बैठका. भारत-पाक पंतप्रधानांचे हे नेहमीचेच मॅच फिक्सींग. नेहरु-अयुब खानांपासून आजपर्यंत.1960 देशाची जनता, गरिबी, दारिद्र्याच्या वणव्यात होरपळत असताना पं. नेहरु व त्यांचे मंत्रिमंडळ ‘महागाई’ कमी होईल, या आशेने चंद्रकोरीकडे पाहत बसले.1962 अरुणाचल प्रदेशात चिन्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला तरी पं. नेहरु आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन पडखाऊ धोरण सोडत नव्हते.1967 इंदिराजींनी काँग्रेस व सत्तेची सूत्रे हाती घेताच झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगाल, तमिळनाडुसह नऊ राज्यांत काँग्रेसविरोधी कौल मिळाला आणि इंदिरा विरोधकांच्या हाती कोलीत मिळालं.1971 इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा राजकीय नारा दिला, पण गरीब झोपडीत व राज्यकर्ते अंबारीत बसून फिरू लागले. गरिबी हटाव हे शेवटी ढोंगच राहीले.1981 बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या भूमिपुत्रांस असे चिरडले. देशाचा नकाशा विद्रुप केला. मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाची आणि अस्मितेची जाणीव करुन देण्यासाठी.1984 शब्दाची गरज नाही. देश अंधारला. इंदिराजी गेल्या.टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनाBalasaheb ThackerayShiv Sena