BEST Flags Off Electric Air Conditioned Hybrid Buses In Mumbai
मुंबईच्या रस्त्यांवर आजपासून धावणार हायब्रीड बसेस By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 01:18 PM2018-03-19T13:18:19+5:302018-03-19T13:18:19+5:30Join usJoin usNext मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच वीजेवर चालणाऱ्या हायब्रीड बसेस धावताना दिसणार आहेत. आजपासून या हायब्रीड बस सेवेचा शुभारंभ होणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमातंर्गत टाटा कंपनीने या इलेक्ट्रीक बसेसची निर्मिती केली आहे. या हायब्रीड बसेस पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये मोबाईल चार्जिंग पोर्ट, वायफाय सुविधा, एल.ई.डी. स्क्रीन, सीसीटीव्ही आणि जीपीएस सुविधा उपलब्ध आहे. दिव्यांगांसाठी बसमध्ये मोकळी जागा आणि बसमध्ये व्हीलचेअर नेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. ही हायब्रीड बस गीअरलेस, क्लचलेस असून यामध्ये 31 आसने आहेत. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हायब्रीड बसचे तिकीट दर हे 16 रुपये ते 110 रुपयांपर्यंत आहेत. हिरानंदनी ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल 110 रूपये, बोरीवली स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल 94 रुपये, जलवायु विहार, खारघर ते वांद्रे कुर्ला संकुल 110 रुपये, एम.पी.चौक ते धारावी डेपो 42 रूपये असे तिकिटांचे दर असतील.टॅग्स :बेस्टमुंबईBESTMumbai