CBSE Exam - पुनर्परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 21:55 IST2018-03-30T21:55:07+5:302018-03-30T21:55:07+5:30

पेपरफुटीनंतर दिल्ली आणि हरयाणा वगळता इतर राज्यांमधील सीबीएसईची दहावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या सचिवांनी स्पष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी केक कापून आनंद व्यक्त केला.

सीबीएसईचा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत होते.

आता फक्त फुटलेल्या 12वीच्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. तर दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला आहे.