मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 11:56 PM2017-11-03T23:56:09+5:302017-11-04T00:09:59+5:30Join usJoin usNext कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाऊन पूजाअर्चा केली जाते. (छाया- सुशील कदम) मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथेही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला होता. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा केला गेलाय.टॅग्स :मुंबईMumbai