श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटींनी केली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:16 IST2018-02-28T14:16:33+5:302018-02-28T14:16:33+5:30

श्रीदेवींचं पार्थिव निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांचे पती बोनी कपूर यांचं सांत्वन करण्यासाठी सेलिब्रिटी ग्रीन एकर्स येथे पोहोचले आहेत.
जावेद अख्तर, शबाना आझमी, रवीना टंडन आणि मलायका अरोरा, शाहीद कपूर हे कलाकार मंडळींसुद्धा श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली
श्रीदेवींना निरोप देण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी, विद्या बालन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
अभिनेता विवेक ओबेरॉय, हेमा मालिनी, राजकुमार राव आणि डिंपल कपाडिया यांनीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली.
जया बच्चन, ऐश्वर्या रॉय, सुश्मिता सेन यांनी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली.
माधुरी दीक्षित, ऊर्वशी रौतेला यांनीही सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, अनू कपूर, जया बच्चन यांनीही श्रीदेवींना श्रद्धांजली अर्पण केली.
अभिनेत्री तब्बू आणि सुलभा आर्यासुद्धा श्रद्धांजली वाहण्यासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल झालेत.
पती अजय देवगणसह अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांनी श्रीदेवींना अखेरचा निरोप दिला आहे.