Chartered Plane Crashed In Mumbai :Chartered plane crashed in Ghatkopar; 5 dead, several injured
Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 03:14 PM2018-06-28T15:14:22+5:302018-06-28T15:27:36+5:30Join usJoin usNext घाटकोपर भागातील सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत. महिला वैमानिकासह तीन तंत्रज्ञ व एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे येथे मोठी आग लागली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. घाटकोपर पश्चिमेकडच्या एलबीएस मार्गावरील जीवदया लेन येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कम्पाऊंडमध्येच हे विमान कोसळले. अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचे होते. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या विमानाची 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनकडे विक्री केली होती. या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. टॅग्स :मुंबई विमान दुर्घटनाविमानअपघातघाटकोपरMumbai Plane CrashairplaneAccidentGhatkopar