भारतीय लष्काराने उभारलेल्या पुलांचं मुख्यमंत्री-रेल्वेमंत्र्यांकडून लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 21:46 IST2018-02-27T21:46:38+5:302018-02-27T21:46:38+5:30

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर भारतीय लष्कराने उभारलेल्या तीन पादचारी पुलांचं लोकार्पण करण्यात आले आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते या पुलांचे लोकार्पण झाले.
मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या स्थानकांना जोडणारे पादचारी पूल लष्कराने बांधले.
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इतर दोन पुलांचं लोकार्पण करण्यात आले.
विशेष म्हणजे, एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार अरविंद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ असा लोकलने प्रवास केला.